Weather Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज | पुढारी

Weather Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात, तर सोमवारी मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात तीन ते चार अंशांनी घट, तर किमान तापमानात तेवढीच वाढ ढगाळ वातावरणामुळे झाली आहे.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तसेच गुजरात, महाराष्ट्र, गोवा या किनारपट्टीसह अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार झाले. अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

भारतच पनीरचा निर्मिता, साडेचार हजार वर्षांपूर्वीच केली निर्मिती!

शिक्षण : समूह विद्यापीठांनी काय साधणार?

धुळे : लोकसभेच्या जागेवर भाजपकडून डॉक्टर भामरे की दिघावकर?

Back to top button