धुळे : लोकसभेच्या जागेवर भाजपकडून डॉक्टर भामरे की दिघावकर?

धुळे : लोकसभेच्या जागेवर भाजपकडून डॉक्टर भामरे की दिघावकर?
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत आतापर्यंत राज्यात ३४ लोकसभा क्षेत्रामधील दौरा केला आहे. यात ४२ हजार लोकांची संपर्क केल्यानंतर अवघ्या १६ जण सोडले तर उर्वरित सर्वांनी एका सुरात २०२४ मध्ये पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांनाच समर्थन दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा २०२४ मध्ये तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी हेच विराजमान होणार असल्याचे प्रतिपादन आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात केले आहे. यावेळी पुढील खासदार पदावर डॉक्टर सुभाष भामरे यांना मतदार मतदान देतील, असे सांगत असतानाच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नशिबात असेल तर त्यांना देखील खासदारकी मिळू शकते ,असे सांगून त्यांनी संभ्रम निर्माण केला.

धुळ्यात आज भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हुडको परिसरातील जनते समवेत संवाद साधला. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, जिल्ह्याच्या प्रभारी स्मिताताई वाघ, खासदार डॉक्टर सुभाष भामरे ,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, शहर महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभाताई चौधरी ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर  मंचावर उपस्थित होते.

 चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात १२ कार्यालयाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत ३४ व्या लोकसभेला आपण भेट दिली असून पुढील पंधरा दिवसात अन्य लोकसभा क्षेत्रांना देखील भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ४२ हजार लोकांबरोबर संवाद साधला असून यातील अवघे १६ सोडले तर सर्वांनी एका सुरात २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी हेच हवे ,असे स्पष्ट केले. काश्मीरच्या प्रश्नावरून काँग्रेसने गेल्या ६५ वर्षात दोन विधान ,दोन प्रधान आणि दोन निशाण असे धोरण राबवले .मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्णय घेऊन ३७० कलम हटवले .त्यामुळे एक विधान आणि एक प्रधान ही बाब प्रत्यक्षात घडून आली. त्यामुळे काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा डौलाने फडकतो आहे. गेल्या पन्नास वर्षात काश्मीरमध्ये 18 लाख पर्यटक गेले. मात्र या एकाच वर्षात एक कोटी 82 लाख पर्यटकांनी भेटी देऊन लाल चौकातील तिरंग्याला सलाम केल्याचा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.

खासदारकीच्या उमेदवारीवरुन संभ्रम

धुळे लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे हे आहेत. आज जनतेला मार्गदर्शन करत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मत भारतीय जनता पार्टीला दिल्यामुळे परिवर्तन झाल्याचे सांगत असतानाच यापुढील काळात देखील डॉक्टर सुभाष भामरे यांना जनता भरभरून प्रतिसाद देईल, असे सांगितले .मात्र त्यानंतर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिखावकर हे मंचावर उपस्थित असल्यामुळे त्यांनी प्रतापराव दिघावकर यांना उद्देशून डॉक्टर भामरे यांचे कार्य सांगितले. तसेच दिघावकर यांच्या नशिबात असेल तर त्यांना देखील खासदारकी मिळू शकते, असे सांगितले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये लोकसभेचे भविष्यातील उमेदवार डॉक्टर भामरे की दिघावकर याबाबतचा संभ्रम मात्र कायम राहिला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news