Crime
Crime

Crime news : मित्राच्या बायकोला फोन करतो म्हणून तरूणावर गोळीबार

Published on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या बायकोला फोन करतो म्हणुन एकावर गोळीबार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी (दि२३) चांदुस,(ता खेड) येथे घडली. जखमी शुभम संतोष तांबे (वय २० रा. आसखेड बुद्रुक , ता खेड) यानेच खेड पोलीस ठाण्यात हल्ल्याची फिर्याद दिली आहे. गावातीलच अंकुर कारले असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. शुभम तांबे हा गावातील केतन कारले यांच्या बायकोला फोन करतो यावरून सात महिन्यापुर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. यातूनच गुरूवारी रात्री अकरा वाजता केतन कारले याने शुभम तांबे याला फोन करुन अंकुर कारले हा मला मारणार आहे. तू माझे घरी येऊन मला घेऊन जा. असे सांगून घरी बोलविले. अंकुर कारले हा तेथे अगोदरच दबा धरुन बसला होता.

त्याने पिस्तुलाने शुभम तांबे याच्या पोटात गोळी मारुन गंभीर जखमी केले. गोळी लागल्यावर जखमी अवस्थेत त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पळत जाऊन एका घरासमोर असलेल्या दोघांना विनंती करत पलायन केले. तांबे याला राजगुरुनगर येथे पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असून फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news