Crime News : पीएमपीएमएलच्या महिला वाहकाला धक्काबुक्की; दोघे ताब्यात | पुढारी

Crime News : पीएमपीएमएलच्या महिला वाहकाला धक्काबुक्की; दोघे ताब्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकाला दोघांनी मिळून धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. 2) बोपखेल फाटा ते वडमुखवाडी या रोडवर घडली. याप्रकरणी महिला वाहक यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास मारुती सातपुते (30, रा. मोशी) आणि एक अल्पवयीन मुलगा यांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी पीएमपीएलमध्ये वाहक म्हणून काम करतात. दरम्यान, बुधवारी त्या मनपा येथून आळंदीकडे जाणार्‍या बसमध्ये कर्तव्य बजावत होत्या. या वेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांच्या हातातील मशीन ओढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांनी फिर्यादी यांना मोबाईलने मारहाण केली. आरोपींना बसच्या खाली उतरवले असता त्यांनी फिर्यादी आणि चालकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा

Pune Metro : दिवाळीत मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक

Pune : खेड तालुक्यात सापडल्या 39 हजार 682 कुणबी नोंदी

Back to top button