मोहम्मद अश्फाक हुसैन आणि इकबाल इजराइल आलम ( वय 27, दोघे रा. जिन्नतपूर, गोल पोखेर धरमपूर उत्तर प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 ऑक्टोबर रोजी वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साळुंखे विहार रस्त्यावरील जश्न हॉटेलच्या कार्यालयातील तिजोरीमधील तब्बल 26 लाख 54 हजारांची रोकड आणि 3 लाख रुपयांचे रोलॅक्स कंपनीचे घड्याळ चोरी झाले होते. या वेळी हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी मोहम्मद हुसैन हा देखील त्या दिवसापासून फरार झाल्याने त्याच्यावर संशय व्यक्त झाला होता. ही चोरी त्यानेच केल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दखल केला.