Pune : वालचंदनगर कंपनीचे कामगार संपावर | पुढारी

Pune : वालचंदनगर कंपनीचे कामगार संपावर

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये विविध मागण्यांबाबत समझोता न झाल्यामुळे बुधवार (दि. 22) पासून कंपनीतील कामगारांनी संप सुरू केला आहे. वेतनवाढीचा करार करणे, कामगारांचे अपग्रेडशन, व्यवस्थापन व कामगार संंबंध सुधारणा करणे, कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे, कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेमध्येे कंत्राटी कामगारांचा होत असलेला बेकायदेशीर वापर थांबवणे व कामगारांना गणवेश द्यावे, अशा कामगारांच्या मागण्या गेल्या काही महिन्यांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या नेतृत्वात कामगारांनी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारला आहे.

अनेकदा कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेमध्ये तडजोडीच्या बैठका होऊनही तोडगा न निघाल्याने अखेर बुधवारपासून कामगारांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांनी संप करू नये म्हणून मंगळवारी (दि. 21) बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी व्यवस्थापन व कामगार संघटनेची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी एकत्र येत संपाचा निर्णय घेऊन बुधवारी रात्रपाळीला जाणारे कामगार कंपनीमध्ये कामावर गेलेच नाहीत. बुधवारी सकाळी सर्व कामगार युनियनच्या कार्यालयासमोर एकत्र जमले होते. या सर्व परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

हेही वाचा :

Back to top button