Crime News : कनिष्ठ सहायकाला लाच घेताना पकडले | पुढारी

Crime News : कनिष्ठ सहायकाला लाच घेताना पकडले

पुणेः पुढारी वृत्तसेवा : महावितरण कार्यालय बंडगार्डन विभागातील एका कनिष्ठ कार्यालयीन सहायकाला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी, शेख याच्या विरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात भ—ष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहिल सुलेमान शेख (वय 42) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एकाच दिवसात ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या सदनिकेचे लाईट मीटर कनेक्शन कायमचे खंडित करण्यात आले होते. ते परत चालू करून बिल ऑनलाईन चालू करून देण्यासाठी तक्रारदाराकडे शेख याने साडेसहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, याबाबत मंगळवारी (दि.21) तक्रारदारांनी लाचलुपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, शेख याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, मोहम्मदवाडी येथे सापळा रचून शेख याला तडजोडीअंती साडेचार हजारांची लाच घेताना पथकाने पंचासमक्ष पकडले. शेख याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

Pune News :ससून अधिष्ठातापद; अध्यादेशाची प्रतीक्षाच

वुली मॅमथ पुन्हा होणार जिवंत?

मराठवाड्याला पाणी सोडण्यास आ. फरांदेंचा विरोध कायम

Back to top button