नारायणगाव ग्रामपंयतीच्या उपसरपंचपदी कोणाची वर्णी? | पुढारी

नारायणगाव ग्रामपंयतीच्या उपसरपंचपदी कोणाची वर्णी?

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक 23 तारखेला होणार असून या पदावर कोणाला संधी मिळणार याबाबतची चर्चा सध्या नारायणगाव मध्ये रंगू लागली आहे. मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनलचे नेते संतोष खैरे,माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबू पाटे व त्यांचे इतर महत्त्वाचे सहकारी मिळून पहिल्यांदा उपसरपंच पदाची संधी कोणाला द्यायची? याबाबत निर्णय घेऊ शकतात, त्यांचा निर्णय अंतिम असू शकतो.

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनेलने सरपंचपद तसेच सोळा 16 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ. सौ. शुभदा वावळ या नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच झाल्या आहेत.या पंचवार्षिकला पहिले उपसरपंच म्हणून गणेश पाटे, हेमंत कोल्हे व बाबू पाटे यांची नावं चर्चेत आहेत. बाबू पाटे स्वतः उपसरपंच होतात की इतरांना पहिली संधी देतात याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वार्ड क्रमांक सहा मध्ये निवडून आलेले गणेश पाटे हे जुने व अनुभवी सदस्य म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

वार्ड क्रमांक पाच मधून निवडून आलेले हेमंत कोल्हे यांच्याही नावाचा पहिल्यांदा उपसरपंच म्हणून विचार होऊ शकतो. मात्र पहिली पसंती गणेश पाटे यांच्या नावाला असू शकते.पहिल्यांदा उपसरपंच पदाचा मान बाबू पाटे, गणेश पाटे किंवा हेमंत कोल्हे या तीन नावांपैकी एक नाव अंतिम ठरणार असल्याचे बोलले जाते. अरीफ आतार व संतोष दांगट हे दोघे पुन्हा निवडून आले असले तरी त्यांना यापूर्वी उपसरपंच पदाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुन्हा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा

चंद्रापेक्षा दूरवर लेसरने पाठवला डेटा

मिरज सिव्हिलमध्ये मिळणार अत्याधुनिक उपचार

पोलिसाच्या घरातच चोरट्याचा डल्ला

Back to top button