

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला दिवाळी काळातील आठ दिवसांत 9 कोटी 6 लाख 39 हजार 359 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न दोन वर्षांच्या तुलनेत 3 कोटींनी अधिक आहे. त्यामुळे पीएमपीची दिवाळी यंदा चांगली झाल्याचे समोर आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2080 गाड्या आहेत. त्याद्वारे दररोज 12 ते 13 लाख पुणेकर नागरिक प्रवास करतात. दिवाळी काळात सुध्दा पीएमपीच्या या बससेवेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्यामुळे 2021, 2022 च्या तुलनेत पीएमपीला अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी, पीएमपी अधिकारी, कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा