जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात बदली | पुढारी

जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात बदली

पुणे : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गृह विभागाने सोमवारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूरला, अमरावतीतील उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे पोलिस दलात उपायुक्तपदी, पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बदली धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी, लोहमार्गचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांची अमरावती येथे पोलिस उपायुक्तपदी आणि माधुरी केदार यांची लोहमार्गला अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

हेही वाचा

Weather Update : राज्यात आगामी पाच दिवस पावसाचे

पुन्हा हुलकावणी!

मोबाईल फोनचा दरमहा 5 हजार खर्च वाचविला : पंतप्रधान मोदी

Back to top button