कारमधून अपहरण केल्यानंतर त्यांनी तिला बेशुध्द करण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला काही समजले नाही. तिला जशी जाग येई तसे इंजेक्शन दिले जात होते. त्यानंतर तिने स्वतःला एका खोलीमध्ये असल्याचे पाहिले. याच दरम्यान त्या खोलीमध्ये एक खूप मेकअप केलेली महिला आली. तिने तरुणीला 'तेरेको भी ऐसाच रहना होगा, दुसरी जगह तेरा सौदा करनेवाले है', असे म्हणून तिने इतर मुलांना हिला संभाळून घेऊन जाण्यास सांगितले. तिला नेत असताना गाडीमध्ये दुसर्या दोन मुली होत्या. त्या मुलींचेदेखील हातपाय व तोंड बांधलेले होते. तसेच कारमध्ये तीनजण बसले होते. दरम्यान गाडी एका ठिकाणी थांबल्यानंतर त्या तरुणीला गाडीच्या बाहेर काढून गाडीतील एका मुलाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या मुलाला इतर लोकांनी मारले, तसेच त्याला हाकलून दिले. पुढच्या स्टॉपला एक मुलगा गाडीत चढला. पुढे रात्र व दिवस होत होते, तरी तिला काही समजत नव्हते.