Pune News : शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला | पुढारी

Pune News : शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

बारामती : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी पाडव्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर असते. मात्र यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार रोहित पवार अनुपस्थिती आहेत असे विचारले असता जेष्ठ नेते खा.शरद पवार म्हणाले की, रोहित पवारांची संघर्ष युवा यात्रा दौरा सुरू आहे. प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल. त्यामुळे गैरहजर राहिले. म्हणून गैरसमज करण्याचे काही कारण नाही. असे म्हणत पवारांनी अजित पवारांच्या अनुपस्थिती बाबत बोलणे टाळले. दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमा नंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे. तो खरा आहे. त्यावर नमूद जात व धर्म हे खरे आहे. मात्र काही लोकांनी दुसरा ओबीसी असल्याचा दाखला फिरवला. ओबीसी बाबत आदर मला आहे. मात्र जन्माने प्रत्येकाला जी जात असते ती मी लपवू शकत नाही.. संपूर्ण जगाला माहिती आहे माझी जात कोणती आहे. ती मी लपवू इच्छित नाही. जातीवर समाजकारण, राजकारण मी आजवर केले नाही आणि करणार नाही. मात्र या वर्गाचे जे प्रश्न आहेत. त्यासाठी जो हातभार लावावा लागेल. तो मी निश्चित लावेल अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. दुष्काळाबाबत बोलताना पवार म्हणाले की, दुष्काळाबाबत राज्य सरकारने सुरुवातीला निकाल जाहीर केला.

त्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाऊस नाही पाणी नाही. जनावरांचे हाल आहेत. सामान्य लोकांचे हाल आहेत. योग्य प्रकारची माहिती केंद्र सरकारला पोहोचवायची होती. ती माहिती राज्य सरकारला पोहोचवण्यात कमतरता आली म्हणून आम्ही केला आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा प्रश्न मांडला. त्यानंतर यामध्ये दुरुस्ती करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. पुढील दोन-तीन दिवसात काहीतरी होवं अशी अपेक्षा आहे..

शिवसेना ठाकरे व शिंदे गटावर बोलताना पवार म्हणाले की, अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. त्या ठिकाणी त्यांची संघटना मजबूत आहे. दुर्दैवानं अनेक वर्षांपासून त्यांचं जे ऑफिस होतं.. ते बुलडोझरने तोडले गेले.. माझ्यामते असल्या गोष्टी थांबवाव्यात.. राज्याच्या प्रमुखांकडून हीच अपेक्षा असते की, त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका घ्यायला हवी. अशाप्रकारे कार्यालय तोडणे ही भूमिका योग्य नाही.

पूर्वी राजकारणात हिंदू मुस्लिम वाद पेटविले जायचे. सध्या मराठा ओबीसी वाद पेटवला जात आहे का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, मला असे वाटते की, ओबीसी आणि मराठा वाद नाही. काही लोक तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांना यात रस नाही. त्यांचे जे प्रश्न आहेत. मग ते सुटले पाहिजेत मग ओबीसी असेल मराठा असेल. त्यांचे न्याय प्रश्न सोडवण्याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने करावी. अशी त्यांची अपेक्षा आहे.

मराठा व धनगर आरक्षणावर बोलताना पवार म्हणाले की,राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे. धनगर आरक्षणासंदर्भात काल खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील उपोषणकर्त्याशी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी सामंजसाची स्थानाची भूमिका यावेळी घेतली. त्यांनी काही प्रश्न मांडले. ते प्रश्न केंद्राचे असतील. ते तिथे मांडावे लागतील. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांच्या भावना तीव्र आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य व केंद्र सरकारचा आहे. आरक्षणाच्या संदर्भातील भावना तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू, असे पवार म्हणाले.

हेही वाचा

Earthquake in Ladakh and Sri Lanka | लडाख आणि श्रीलंकेला भूकंपाचे जोरदार धक्के

Pune News : ऊस उत्पादकांना येणार सोन्याचे दिवस

River Linking Project : नद्याजोड प्रकल्पामुळे दुष्काळाला आमंत्रण; IIT मुंबई, IITM पुण्याचे संशोधन

Back to top button