पिंपरी : पालेभाज्या स्वस्त; कांदा, मटार वधारले | पुढारी

पिंपरी : पालेभाज्या स्वस्त; कांदा, मटार वधारले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळी सणाला घरोघरी स्वयंपाक घरात गृहिणी फराळाचे पदार्थ बनवत असल्याने पालेभाज्यांचा वापर कमी होतो. त्यामुळे शहरातील भाजी मंडईतील पालेभाज्यांच्या दरात काहीशी घट झाली आहे. मात्र कांद्याला अधिक मागणी आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. तसेच मटार, आले, लसूण आणि शेवग्याच्या दरातही वाढ झाली आहे. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमध्ये किरकोळ बाजारात मेथी, पालक, कांदापात, कोथिंबीरीची जुळी वीस रूपये तर कांदा प्रतिकिलो पन्नास रूपये तर मटार, आले, लसणाचे दर अद्यापही वधारलेले आहेत.

मोशी उपबाजारातील घाऊक दर ः (प्रतिकिलो)
कांदा 27 ते 30, बटाटा 9 ते 11, टोमॅटो 9 ते 12, आले 70 ते 80 , लसून 80, मटार 80 ते 90, शेवगा 70 ते 80, काकडी 12 ते 15 व गवार 35 ते 40 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
कांदा 128, बटाटा 333, आले 18, लसून 4, गाजर 37, गवार 10, शेवगा 5, हिरवी मिरची 101, टोमॅटो 249, काकडी 69 क्विंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकुण 26200 गड्डी, फळे 65 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 1485 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रति जुडी)
मेथी 20
कोथिंबीर 20
कांदापात 20
शेपू 20
पुदिना 10
मुळा 15
चुका 20
पालक 20

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 50 ते 60
बटाटा 25 ते 30
आले 210
लसुन 220
भेंडी 60 ते 70
टोमॅटो 25 ते 35
सुरती गवार 80
गावरान गवार 120
दोडका 80
लाल भोपळा 60 ते 70
कारली 60
मटार 200
वांगी 60
भरीताची वांगी 80
तोंडली 60
पडवळ 60
फ्लॉवर 40
कोबी 40
काकडी 40
शिमला 60
शेवगा 120 ते 130
हिरवी मिरची 70 ते 80
वाल 80
राजमा 120
श्रावणी घेवडा 120

Back to top button