सावित्रीच्या लेकींसाठी रेड कार्पेट ; भरतीसाठी स्वतंत्र अभियान | पुढारी

सावित्रीच्या लेकींसाठी रेड कार्पेट ; भरतीसाठी स्वतंत्र अभियान

गणेश खळदकर

पुणे : पुरुषी वर्चव असलेल्या क्षेत्रांबरोबरच आता विविध क्षेत्रात महिलांनी त्यांचे महत्त्व सिद्ध करत स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात महिलांचा डंका असून, खासगी क्षेत्रात नोकरीसाठी मुलींना रेड कार्पेट टाकले जात आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, सेवा, तेल आणि नैसर्गिक वायू, उद्योग, खाण आदी क्षेत्रात विद्यार्थिनींची मागणी वाढली असून अभियांत्रिकी आणि सेवा क्षेत्रात वूमन इन इंजिनीअरिंग ही संकल्पना रुजत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. डायव्हर्सिटी बेंच मार्किंग रिपोर्ट 2022 -23 नुसार, खासगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये जवळपास 300 कंपन्यात महिलांचे प्रमाण साधारण 50 टक्के इतके असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हेच प्रमाण 36 टक्के आहे. यातून असे आढळून आले की, साधारण 70 टक्के कंपन्यात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी परिभाषित 4पान 4 वर

महिलांसाठी पुरविल्या जाणार्‍या सुविधा
कामाच्या वेळेत लवचिकता
मुलांच्या संगोपनाच्या सुविधा
मातृत्व आणि दत्तक रजा
आरोग्यासाठी उपक्रम
घरून काम करण्याची सवलत

वूमन इन इंजिनीअरिंग संकल्पनेमुळे मुलींना काही विशेष अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यांच्यासाठी वेगळी निवड प्रक्रिया राबविली जात आहे. आकर्षक पॅकेजेस आणि सुविधा देण्यावर कंपन्यांचा भर आहे.
– प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, सहयोगी अधिष्ठाता, अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संकुल एमआयटी विश्वशांती विद्यापीठ

Back to top button