Pune News : पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा | पुढारी

Pune News : पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

शिर्सूफळ : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यामध्ये शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य बाळासाहेब गावडे यांनी पारवडी ग्रामपंचायतीवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. गेली पन्नास वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर गावडे यांचे वर्चस्व आहे.

पारवडी येथे भाजप पुरस्कृत श्रीभैरवनाथ विकास पॅनेलच्या सरपंच म्हणून बाळासाहेब गावडे यांच्या सून मयूरी अनिकेत गावडे या 462 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीभैरवनाथ ग्रामपरिवर्तन पॅनेलच्या हर्षदा शत्रुघ्न गावडे यांचा पराभव केला. थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक असल्याने सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच होती.

भाजपच्या वतीने श्रीभैरवनाथ विकास पॅनेल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीभैरवनाथ ग्राम परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये भाजपच्या सरपंच मयूरी गावडे व 9 सदस्य निवडून आले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य निवडून आले.
सरपंचपदासाठी मयूरी गावडे यांना 2099 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हर्षदा गावडे यांना 1637 मते मिळाली. मोहन सांगळे यांनी श्रीभैरवनाथ विकास पॅनेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

कल्पना सुनील लांडगे, दत्तात्रेय गुलाबराव गावडे, करण तानाजी गावडे, हर्षदा शत्रुघ्न गावडे, कान्होपात्रा पांडुरंग बेगारे, अंबादास पांडुरंग होले, अलका गोरख गावडे, बाबासाहेब सोपानराव पोंदकुले, मंदा लाला गवंड, सुनील किसन गावडे, धनंजय पंचनयन शिंदे, हर्षदा शत्रुघ्न गावडे, जयश्री सतीश गावडे, प्रियांका नंदकुमार नगरे.

हेही वाचा

राष्ट्र निर्माणमध्ये भारतीय जवानांचे मोठे योगदान: पंतप्रधान मोदी

Pune News : सातगाव पठार भागात आढळल्या 137 कुणबी नोंदी

Beed News: मातोरी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

Back to top button