Pimpri News : मलबार व्हिस्टलिंग थ्रश पक्षास जीवदान | पुढारी

Pimpri News : मलबार व्हिस्टलिंग थ्रश पक्षास जीवदान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुर्मिळ प्रजातीचा मलबार व्हिस्टलिंग थ्रश पक्षी वाकड येथील सोसायटीमध्ये जखमी अवस्थेत आढळला. सोसायटीतील एका महिलेने त्वरित वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या प्राणीमित्रांशी संपर्क केला. वर्ल्ड फॉर नेचरचे वन्यजीव संरक्षक प्रणीत आढाव याने त्या पक्ष्यास ताब्यात घेतले. शीळ घालून अनेक अभ्यासक, निसर्गप्रेमी, छायाचित्रकार यांना संमोहित करणारा शिळकरी कस्तूर ज्याला इंग्रजीत मलबार व्हिस्टलिंग थ्रश म्हणतात. याला इंग्रजीत स्कूल बॉयदेखील म्हणतात.

हा पश्चिम घाटात आढळणारा पक्षी असून, दुर्मिळ प्रजातीचा असल्याने याचे पिंपरी- चिंचवड शहरात दर्शन होणे कुतूहलाची बाब आहे. सदर पक्ष्याला वाहनाची धडक लागली असल्याने अंतर्गत दुखापत झाली आहे. शिळकरी कस्तूर हा पक्षी शिट्टी वाजवून गायन करतो. पश्चिम घाटात पाणथळ परिसरात धबधब्याजवळ नद्यांजवळ हा पक्षी आढळतो. ते सहसा प्रवाहाच्या काठावरील पोकळीत घरटे बांधतात; परंतु काहीवेळा जवळच्या इमारतींचा वापर करतात.

ते सहसा एकटे किंवा जोडीने दिसतात. ते पहाटेच्या आसपास बराच वेळ गाऊ शकतात. हे पक्षी प्रामुख्याने किडे, गोगलगाय, गांडुळ, खेकडे, छोटे बेडूक तसेच जमिनीवर पडलेले उंबर व फळे खातात. दिसायला देखणा आणि त्याचे शरीर काळपट व त्यावर निळ्या रंगाची छटा असते, चकचकीत व सुंदर शरीर असल्याने याचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकार भटकंती करत असतात, अशी माहिती संस्थेचे संस्थापक शुभम पांडे यांनी दिली.

हेही वाचा

Pippa Movie : ईशान खट्टर, मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युलीचा पिप्पा उद्या रिलीज

नाशिक : खर्डे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप

जळगाव : कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार 

Back to top button