Grampanchayat Result : बारामती तालुक्यात दोन ग्रामपंचायती भाजपकडे  | पुढारी

Grampanchayat Result : बारामती तालुक्यात दोन ग्रामपंचायती भाजपकडे 

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील ३१ पैकी २ ग्रामपंचायतींवर भाजपने सरशी केली आहे. पारवडी व चांदगुडेवाडी येथे भाजपचे सरपंच झाले आहेत. अन्य ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (दि. ६) येथील प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. या निवडणूकीत भाजपने तालुक्यात चांगलीच एन्ट्री केली. यामध्ये भाजप नेते बाळासाहेब गावडे यांच्या ताब्यातील पारवडी ग्रामपंचायत त्यांच्याकडे पुन्हा राहिली. सरपंचपदासह गावडे यांच्या पॅनेलने नऊ जागी विजय मिळविला.  चांदगुडेवाडीत भाजप नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वात सरपंचपद भाजपकडे गेले, चार जागा भाजपने मिळविल्या.
संबंधित बातम्या :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात भाजपने सदस्य पदाच्या दोन जागा पटकावल्या. सरपंचपद मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडेच कायम राहिले. येथील निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यंदा येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात राज्यातील सत्तेत सहभागी असणारे शिंदे-फडणवीस व पवार या तिन्ही गटाचे उमेदवार रिंगणात होते. निवडणूक कालावधीत पैसे वाटपावरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु अखेरीस अपेक्षेप्रमाणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराने सरपंचपदी बाजी मारली.

Back to top button