Grampanchayat Result : पाडळी- बारव मध्ये सत्ताधाऱ्यांची सरशी ; सरपंचपदी स्वाती कबाडी

Grampanchayat Result : पाडळी- बारव मध्ये सत्ताधाऱ्यांची सरशी ; सरपंचपदी स्वाती कबाडी

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरालगत असलेल्या पाडळी-बारव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. या चौरंगी लढतीत स्वाती कबाडी यांना ११५१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सोनाली लोखंडे (९२८), क्रांती चव्हाण (४९२) आणि रेखा कबाडी यांना २२५ मते मिळाली. गेल्या पाच वर्षांतील केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे प्रचारप्रमुख व माजी सरपंच संतोष केदारी आणि ज्ञानेश्वर कबाडी यांनी सांगितले.

निवडून आलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे –

वॉर्ड क्रमांक १: संतोष मारुती केदारी, मनिषा अनंत रेंगडे, मनिषा हनुमंत लोखंडे.

वॉर्ड क्रमांक ३: आत्माराम ज्ञानेश्वर कबाडी, ज्योती जयसिंग पापडे, पुष्पा बाळु कडू.

वॉर्ड क्रमांक ४: सर्वसाधारण – संजय गोविंदसिंग राजपूत, जिजाबाई शांताराम रेंगडे, शितल विनायक कळंबे. वॉर्ड क्रमांक ५: सय्यद नेमतअली फजल हुसेन, आदिती बाळासाहेब सदाकाळ, राजेश धारू कारभळ.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news