Grampanchayat Result : वडगाव बांडे, पानवली येथे आमदार राहुल कुल समर्थकांची बाजी

Grampanchayat Result : वडगाव बांडे, पानवली येथे आमदार राहुल कुल समर्थकांची बाजी

राहु : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील वडगाव बांडे, पानवली येथे भाजपचे आमदार राहुल कुल समर्थकांनी बाजी मारली आहे. वडगाव बांडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुभाष कुलाळ यांनी माजी सरपंच भगवान मेमाणे यांचा १०६ मतांनी पराभव करत विजयी गुलाल उधळला, तर पानवली येथे प्रज्ञा आबासो भांड यांनी लता विलास बोरावणे यांचा सहा मतांनी पराभव केला.वडगाव बांडे येथे सरपंचपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. तत्कालीन माजी आमदार रमेश थोरात समर्थक भगवान मेमाणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर आमदार राहुल कुल यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. सदस्यपदाच्या पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

भगवान मेमाणे, सुभाष कुलाळ व संभाजी जाधव यांच्यामध्ये सरपंचपदासाठी चुरशीची निवडणूक झाली होती. दोन मराठा व एक धनगर समाजाचा उमेदवार असलेल्या ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार कुलाळ यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. या निवडणुकीमध्ये सुभाष कुलाळ यांना ४९९ मते मिळाली. भगवान मेमाणे यांना ३९३ मते तर संभाजी जाधव यांना २०५ मते मिळाली.

पानवली येथेही सरपंचपदासाठी चुरस होती. येथील सदस्य पदाच्या सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. सरपंचपदाची एकतर्फी वाटणारी ही लढत मात्र चुरशीची झाली. प्रज्ञा आबासो भांड या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांचा सहा मतांनी पराभव झाला होता यावेळेस त्यांनी कुल भाजपभध्ये प्रवेश करत सहा मतांनी विजय मिळवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news