Dilip Valse Patil : दिलीप वळसे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क | पुढारी

Dilip Valse Patil : दिलीप वळसे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : निरगुडसर  येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. ५) मतदानाचा हक्क बजावला. आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतपैकी २१ ग्रामपंचायतीचे निवडणूक मतदान रविवारी होत आहे. त्यानुसार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गाव असलेल्या निरगुडसर ग्रामपंचायत निवडणूक मतदान असल्याने मंत्री वळसे पाटील जिल्हा परिषद शाळेत मतदान करण्यासाठी आले होते.

त्यांच्यासमवेत कन्या पूर्वा वळसे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजाविला. अवसरी बुद्रुक येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. ६) घोडेगाव तहसील कार्यालय येथे मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.

Back to top button