Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलिस चौकीत राडा | पुढारी

Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलिस चौकीत राडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज पोलिस चौकीत गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला आहे. रोहित पवार (वय 26), सूरज कांबळे (वय 19), अजय अहिवळे (वय 24), राणी पाटील (वय 26), मयूर राऊत (वय 24, सर्व रा. खोपडेनगर), अल्फीया ऊर्फ लंगडी, खुशबू, आकाश यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई केतन लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 30 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात तृतीयपंथीय वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडून पैसे गोळा करतात. त्यांना सनी नावाचा एकजण त्रास देत होता. सनी दारू पिऊन त्यांना मारहाण करत असल्याने तृतीयपंथीयांनी तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कात्रज पोलिस चौकीत नेले. पोलिस चौकीत तृतीयपंथीय जमले. त्यांनी सनीला ताब्यात द्या, अशी मागणी केली.

त्याचा आम्ही खून करणार आहोत, असे सांगून पोलिस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तृतीयपंथीयांनी टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तृतीयपंथीयांनी पोलिस चौकीत गोंधळ घालून पोलिस शिपाई लोखंडे यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.

कर्जाच्या बहाण्याने फसवणूक

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने चौघांनी एका व्यक्तीला तब्बल 20 लाख 60 हजारांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी, चंदनगर पोलिसांनी नरेश राम अहिरे, कुमार परिक्षित, श्वेता उंडे, धीरज तुकाराम पवार या चौघां विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजाराम तुकाराम चौधरी (वय 59, रा. चंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 15 जानेवारी ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुणे आणि मुंबई परिसरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपींनी विश्वासात घेऊन संगनमत करत फायनान्स कंपनीचे कर्ज मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रोसेसिंग आणि करारनामाच्या नावाखाली 20 लाख 60 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना न कर्ज मिळवून दिले न त्यांचे घेतलेले पैसे परत दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. चौकशीअंती पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

हेही वाचा

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Pimpri News : पात्र उमेदवार नोव्हेंबरअखेरपर्यंत रुजू

Pimpri News : बेशिस्त पार्किंग; तरीही वाहतूक विभाग सुस्त

Back to top button