Pimpri News : शहरात नारीशक्तीचा जागर | पुढारी

Pimpri News : शहरात नारीशक्तीचा जागर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जवळपास तब्बल तीन हजार महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्व हिलिंगच्या संस्थापिका अर्चना अग्रवाल तर प्रमुख वक्त्या सुवर्णा गोखले, डॉ. अश्विनी धोंगडे, रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक सुरेश उपाख्य, नानाजी जाधव, विभाग संघचालक आप्पाजी गवारे, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, भारती तारे, संयोजिका निवेदिता कच्छवा, सहसंयोजिका ज्योती पठानिया यांचेसह आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अनेक नगरसेविका उपस्थित होत्या.

सुवर्णा गोखले यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांची प्रगती हा विषय प्रभावीपणे मांडला. दुसर्या सत्रात शिक्षण, राजकारण, स्वास्थ्य, सुरक्षा, आर्थिक साक्षरता, रोजगार प्रसार माध्यमे विषयावर सहा गटात चर्चासत्रे झाली. तिसर्‍या सत्रात प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासह सांघिक गीत गायन झाले.

‘भारतीय स्त्री संस्कारित स्त्री’ या विषयावर बोलताना भारतीय कुटुंबव्यवस्था, घरातील प्रेम, त्याग, आपुलकी यामुळे भारतीय संस्कृतीची महती टिकून असल्याचे सांगत, स्वतःला ओळखून आत्मसन्मान वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. निवेदिता कच्छवा यांनी प्रास्ताविक केले, तर ज्योती पठानिया यांनी आभार मानले. कार्यक्रमस्थानी महिलांसाठी प्रदर्शन व विक्री हेतू विविध वस्तू, पुस्तक प्रदर्शनी लावण्यात आली होती.

हेही वाचा

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune News : ‘अभियांत्रिकी पदवीधर मजुरी करतो हे विश्वासार्ह वाटत नाही’

Pimpri News : बेशिस्त पार्किंग; तरीही वाहतूक विभाग सुस्त

Back to top button