Cold Wave update : देशात नोव्हेंबरमध्ये थंडी कमीच; भारतीय हवामान विभागाची माहिती | पुढारी

Cold Wave update : देशात नोव्हेंबरमध्ये थंडी कमीच; भारतीय हवामान विभागाची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अल निनो सक्रिय असून प्रशांत महासागराच्या वाढत्या तापमानाचा परिणााम हिंदी महासागरावर होत आहे. या स्थितीमुळे नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात थंडी कमीच राहील आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. दक्षिण भारत वगळता देशात पाऊसही सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याची माहिती विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी दिली.

नोव्हेंबरमध्ये तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेश, यमन, रॉयलसीमा, केरळ आणि कर्नाटक या पाच भारतीय द्विपकल्पातील पाच भागांच्या पर्ज्यन्यमानाचा अंदाज व नोव्हेंबरमध्ये थंडी कशी राहील याचा अंदाज महापात्रा यांनी वर्तवला. ते म्हणाले, नोव्हेंबर दक्षिण द्विपकल्पात सरासरीच्या 77 ते 123 टक्के (29 मि.मी) पाऊस पडेल, असा अंदाज आहे. वायव्य भारतातील बहुतेक भागासह पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

तेंडुलकरच्या पुतळ्याचे आज वानखेडेवर अनावरण

कुणबी प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही सुरू करणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कोल्हापुरात उद्यापासून चार दिवस पाणी नाही

Back to top button