पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 22 टक्के पेरण्या पूर्ण | पुढारी

पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 22 टक्के पेरण्या पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 711 हेक्टर असून, त्यापैकी 49 हजार 835 हेक्टरवर म्हणजे सुमारे 21.69 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बारामती, पुरंदर, शिरूर आणि खेडमध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

रब्बी पेरण्यांची स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये -27 ऑक्टोबरअखेर)

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, मका आणि गळीत धान्ये ही प्रमुख पिके आहेत. तालुकानिहाय स्थिती पाहता हवेली – 244 हेक्टर, भोर -185, मावळ -52, जुन्नर- 801, खेड -6 हजार 823, आंबेगाव -1 हजार 680, शिरूर -9 हजार 611, बारामती – 13 हजार 899, इंदापूर – 3 हजार 439, दौंड – 1 हजार 795, पुरंदर – 11 हजार 308 हेक्टरवर रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सरासरी क्षेत्राशी तुलना करता बारामतीमध्ये 30.62 टक्के, तर पुरंदरमध्ये 34.77 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

वनराई बंधार्‍यातील पाण्याचा पिकांना फायदा
कृषी विभागाने मोहीम राबवून जिल्ह्यात सुमारे दोन हजार वनराई बंधारे बांधले आहेत. त्यातील पाणी उपलब्धतेचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होईल. हरभरा आणि गव्हाच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. भाताची काढणी झाल्यानंतर शेतकरी या दोन्ही पिकांच्या पेरण्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे हरभरा, गव्हाच्या पेरण्यांखालील क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचा :

Back to top button