ST employee strike: पुणे विभागातील 325 एसटी कर्मचारी हजर, चालक-वाहकांचा संप अजूनही कायम | पुढारी

ST employee strike: पुणे विभागातील 325 एसटी कर्मचारी हजर, चालक-वाहकांचा संप अजूनही कायम

पुणे : पुढारी वृत्तसेवा

निलंबनाच्या कारवाईनंतर एसटीच्या पुणे विभागातील 13 डेपोंमधील 325 कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत. यात प्रशासन विभाग, यांत्रिकी विभाग, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळेतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मात्र, चालक-वाहकांचा काम बंद आंदोलनअजूनही कायम आहे.

शासनाच्या आदेशानुसार एसटी प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे सत्रच सुरू केले आहे. यामुळे शुक्रवारी एसटीच्या पुणे विभागातील काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर होत आहेत. आतापर्यंत 325 कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता एसटी कर्मचार्‍यांचा संपाला यश मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

– पुणे विभागातील डेपो – 13

– पुणे विभागातील एकूण कर्मचारी – 4 हजार 281

– कामावर हजर झालेले कर्मचारी – 325

– अजूनही संपात असलेले कर्मचारी – 3 हजार 956

टक्केवारीनुसार हजर झालेले कर्मचारी

– प्रशासकीय विभाग – 70 टक्के हजर
– यांत्रिकी विभाग – 5 टक्के हजर
– चालक-वाहक – 0 टक्के हजर

स्वारगेट डेपोतील हजर कर्मचारी

– प्रशासकीय विभाग – 6
– यांत्रिकी विभाग – 5
– चालक-वाहक – नाही

शिवाजीनगर (वा.)/ पुणे स्टेशन येथील हजर कर्मचारी

– प्रशासकीय विभाग – 7
– यांत्रिकी विभाग – 3
– चालक-वाहक – नाही

पिंपरीतील वल्लभनगर येथील हजर कर्मचारी

– प्रशासकीय विभाग – 12
– यांत्रिकी विभाग – 3
– चालक-वाहक – नाही

पुणे विभागातील आतापर्यंत 321 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. विभागीय कार्यालय पुर्ण क्षमतेने सुरू आहे. प्रशासन विभाग, विभागीय कार्यशाळा, यांत्रिकमधील कर्मचारी कामावर हजर होत आहेत.
– चंद्रकांत घाटगे, कामगार अधिकारी, एसटी पुणे विभाग

 

Back to top button