जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेजुरी सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात जागरण गोंधळ घालून आरक्षण मिळावे यासाठी खंडोबा देवाला साकडे घालण्यात आले. तसेच भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विक्रम राजपूत यांचेकडे आरक्षण मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले.
या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी एस. टी. महामंडळाचे बस वर असणाऱ्या शासनाच्या जाहिरातीतील नेत्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. सकल मराठा समाजाचे नेते संदीप जगताप ,लोकेश सावंत,अजिंक्य देशमुख,सुधीर गोडसे,सतीश घाडगे,अनिकेत हरपले,विक्रम माळवदकर,सचिन सोनवणे,दत्तात्रय गावडे,ईश्वर दरेकर,नितीन जगताप,अमित भापकर,निलेश हरपळे व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :