पुण्यातील शिवाजीनगर आगारातून एसटीच्या लातूर, बीडला जाणाऱ्या अठरा फेऱ्या रद्द | पुढारी

पुण्यातील शिवाजीनगर आगारातून एसटीच्या लातूर, बीडला जाणाऱ्या अठरा फेऱ्या रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारातून बीडला जाणाऱ्या नऊ आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा दिवसभरातील एकूण 18 फेऱ्या एसटीने रद्द केल्या आहेत. यामुळे लातूर बीडला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यांना पर्यायी वाहन शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. लातूर बीड भागात सध्या मराठा आरक्षणाचे वातावरण खूपच तापले आहे. त्यातच या भागात एसटीच्या काही गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून एसटी प्रशासनाकडून लातूर आणि बीडला जाणाऱ्या एसटी गाड्या बंद करण्यात आल्या आहेत असे एसटीच्या शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगर व्यवस्थापक ज्ञानेश्वर ननावरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button