Pune : खा. राऊत यांचा दौंडमध्ये मराठा आंदोलकांकडून निषेध | पुढारी

Pune : खा. राऊत यांचा दौंडमध्ये मराठा आंदोलकांकडून निषेध

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रविवारी (दि. 29) दौंड येथे मुक्कामी असताना सकल मराठा समाजाच्या वतीने ते उतरलेल्या हॉटेलबाहेर त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. मराठा आंदोलकांनी ‘खासदार संजय राऊत चले जाव’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे या हॉटेलबाहेरील वातावरण चांगलेच तापले. परिणामी, पोलिसांना मोठा फौजफाटा मागवावा लागला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबा पवार, वीरधवल जगदाळे, नंदू जगताप, अविनाश गाठे यांच्यासह शेकडो मराठा आंदोलक हॉटेलबाहेर जमले होते. या वेळी मराठा आंदोलक म्हणाले की, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ’सामना’ वृत्तपत्रामध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामधून त्यांनी मराठा समाजावर टीका केली होती. त्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले होते. ते एवढे आक्रमक होते की कोणाचेच काही ऐकायला तयार नव्हते.

जवळपास दोन तासांपेक्षा अधिककाळ त्यांनी संजय राऊत हे मुक्कामी असलेल्या हॉटेलखाली येऊन जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु मराठा समाजाच्या काही नेत्यांनी तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे, शहराध्यक्ष आनंद पळसे, तालुका संघटक संतोष जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली व वातावरण शांत झाले.

हेही वाचा :

Back to top button