Weather Update : राज्यात गारठा वाढला; जळगावचा पारा घसरला
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचा किमान तापमानाचा पारा शनिवारी 3 ते 6 अंशांनी घसरला. जळगावचा पारा 6 अंशांनी घसरून 10.9 अंशांवर खाली आला. या तापमानाने हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. तसेच पुणे, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बीड, गोंदिया, यवतमाळ या शहरातही गारठा जाणवत होता. गुरुवारी जळगाव शहराचे तापमान 11.4 अंशांवर होते. शुक्रवारी पुणे शहराचे तापमान 14.4 अंशांवर खाली आले, तर शनिवारी पुन्हा जळगावचा पारा 10.9 अंशांवर खाली आला. त्यामुळे यंदाच्या हंगामातील आजपर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान ठरले.
राज्यात गारठा वाढला
राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात 3 ते 6 अंशांनी घट झाली होती. राज्याचे सरासरी किमान तापमान 15 ते 16 अंशांवर होते. जळगाव शहराचा पारा 6 अंशांनी घसरून 10.9 अंशांवर खाली आला, तर पुणे शहरातील तापमानात 0.4 अंशांनी घट होऊन पारा 14 अंशांवर खाली आला होता.
राज्याचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव 10.9, पुणे 14, महाबळेश्वर 16.5, नाशिक 14.5, छत्रपती संभाजीनगर 14.2, परभणी 15.9, बीड 15.5, अमरावती 16.5, चंद्रपूर 16.4, गोंदिया 15.4, नागपूर 15.9, वाशिम 14.8, वर्धा 16.4 यवतमाळ 15.2.
हेही वाचा

