संत श्री सोपानकाका पालखीचे वाल्ह्यात स्वागत | पुढारी

संत श्री सोपानकाका पालखीचे वाल्ह्यात स्वागत

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  संत श्री सोपानकाका पंचक्रोशी प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 27) सकाळी वाल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. पालखी महर्षी वाल्मीकी ऋषींच्या संजीवनी समाधी मंदिरात विसावली. संत श्री सोपानदेव समाधी मंदिर, सासवड येथून गुरुवारी (दि. 26) निघालेला संत श्री सोपानदेव पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा पहिल्या दिवशीचा दौंडज (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून शुक्रवार सकाळी वाल्ह्यात दाखल झाला. हभप माऊली (छोटे माऊली) महाराज कदम आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला हा सोहळा दहा दिवस चालणार आहे. या सोहळ्यात हभप मंगेश महाराज कदम, सुधाकर गिरमे, दिलीप गायकवाड यांच्या सहकार्याने 200 वारकरी सहभागी झाले आहेत.

वाल्हेनगरीत या सोहळ्याचे स्वागत सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच अमोल खवले, हभप माणिक महाराज पवार, हभप अशोक महाराज पवार, हभप बबन महाराज भुजबळ, विनायक पवार, राजेंद्र लंबाते, मोहन पवार, जयराम पवार आदींनी केले. वाल्हेकरांची सकाळची न्याहरी घेऊन, दुपारचा विसावा परींचे येथे करून पालखी सोहळा भोंगवली (ता. भोर) येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

Back to top button