बारामतीत रविवारी अजित पवार यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन | पुढारी

बारामतीत रविवारी अजित पवार यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन

बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 29) बारामतीतील सहयोग सोसायटीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ठरवून दिलेल्या दिशेनुसार बारामती शहर व तालुक्यात रविवारी एकदिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून ही माहिती देण्यात आली. दि. 29 रोजी संपूर्ण बारामती शहर व तालुक्यात आंदोलन केले जाईल. दि. 30 रोजी खांडज, मळद, पाहुणेवाडी, निरावागज, घाडगेवाडी, दि. 31 रोजी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे, बजरंगवाडी, दि. 1 नोव्हेंबर रोजी माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पणदरे, ढाकाळे, सोनकसवाडी येथे अन्नत्याग आंदोलन होईल.

हेही वाचा : 

Back to top button