Pune : पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली | पुढारी

Pune : पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नुकताच पदभार स्वीकारलेले पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची सोमवारी दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील एस जी कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी या संदर्भातील आदेश सोमवारी काढले आहेत. ओम प्रकाश बकोरिया यांच्यानंतर सिंह यांनी नुकताच पी एम पी चा पदभार स्वीकारला होता. त्यांनी त्यांच्या काळात गेले पी एम पी एम एल मध्ये यूपीआय क्यूआर कोड तिकीट यंत्रणा सुरू केली.

पुणेकरांना जास्तीत जास्त गाड्या मिळाव्या यासाठी ताफ्यातील सर्व गाड्या त्यांनी मार्गावर काढल्या होत्या.  परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होत होती. लवकरच पीएमपीच्या मालमत्तांचे विकसन करून पीएमपीच्या उत्पन्नात आणखीन वाढ करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र इतक्यातच त्यांची बदली झाली. दरम्यान पीएमपीला गेली पाच वर्षात सात पीएमपी अध्यक्ष मिळाले आहेत. यातील कोणालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. कार्यकाळ पूर्ण करता येत नसल्याने पीएमपीचा विकास खुंटला असल्याचे मत व्यक्त करण्यात पीएमपीच्या तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Back to top button