Pune news : सिंहगड रोड परिसरात रंगला ‘खेळ गृहलक्ष्मींचा | पुढारी

Pune news : सिंहगड रोड परिसरात रंगला ‘खेळ गृहलक्ष्मींचा

धायरी : पुढारी वृत्तसेवा :  संगीत खुर्चीसह विविध खेळ खेळताना महिलांनी केलेली धमाल…उखाणे घेताना शब्दांची जुळवाजुळव करताना उडालेली धांदल… विविध गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका.. प्रतिस्पर्धी गटाला मात देण्यासाठी सुरू असलेली धावपळ अन् शेवटी पैठणी विजेत्या नावाची घोषणा केल्यानंतर झालेला जल्लोष… अशा खेळीमेळीच्या वातावरणात ‘खेळ गृहलक्ष्मींचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. अंतिम फेरीत बाजी मारत संपदा शेडगे यांनी मानाची स्वामिनीची पैठणी पटकावली, तर वैशाली गोसावी या उपविजेत्या ठरल्या. नवरात्रोत्सवानिमित्त दै.‘पुढारी’, ‘पुढारी न्यूज’ कात्रज दूध संघ आणि स्वामिनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रोड परिसरात सेरेन काऊंटी सोसायटीत ‘खेळ गृहलक्ष्मींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोसायटीचे अध्यक्ष रामदास गोसावी, माजी अध्यक्ष अरविंद नायक, माधव पाटील, भाई ताम्हाणे, ‘कात्रज दूध’चे मार्केटिंग अधिकारी पांडुरंग कोंढाळकर आदींसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठी वेळ काढता यावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभा भट, संध्या कोकाटे, माधुरी करंदीकर, माधुरी जांभळेकर, सुनीता मांढरे, रूपाली पाटील, श्रुती देशपांडे, अनिता काकडे, अपर्णा चौगुले, श्रद्धा मोहरीर, अंकिता कुंभारकर, प्रियंका भंडारी, आरोही मंटूर, माधुरी यादव, अनिता कुदळे, निता करंजावणे, अनुपमा नायक, शीतल शिरगावे आदींसह सोसायटीतील महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘कात्रज दूध’चे वरिष्ठ व्यवस्थापक कुमार मारणे यांनी या कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन केले.

 

आमच्या सोसायटीत झालेल्या ‘खेळ गृहलक्ष्मींचा’ या कार्यक्रमास महिलांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या वेळी झालेल्या विविध खेळांतून महिलांचा ताणतणाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल. याबद्दल दै. ‘पुढारी’ व कात्रज दूध संघाचे मनापासून आभार.
                                       – रामदास गोसावी, अध्यक्ष, सेरेन काउंटी फेज

 

मला खात्री होती की, पैठणी माझ्याकडेच येणारच ! सुरुवातीपासून मोठ्या उत्साहात या खेळामध्ये सहभागी झाले. पैठणी जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला. महिलांसाठी हा अनोखा उपक्रम
राबविल्यामुळे दै.‘पुढारी’चे आभार.
                                                             -संपदा शेडगे, पैठणीच्या मानकरी.

Back to top button