क्रिकेट सामन्यावर सट्टा; एका बुकीस अटक | पुढारी

क्रिकेट सामन्यावर सट्टा; एका बुकीस अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट विश्चचषक 2023 चे सामने भारतात सुरु असून, यामधील इंग्लंड विरूध्द द. अफ्रिका या सामन्यावर सट्टा घेणार्‍या बुकीला पोलिसांनी शनिवार (दि. 21) रात्री अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून रोख स्वरूपात 40 लाख रूपये आणि दोन मोबाईल व एक कॅल्क्युलेटर असा 40 लाख 80 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दिनेश हरिश शर्मा (38, रा. निरंकारी भवनाजवळ, काळेवाडी) या बुकीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश हरिश शर्मा हा राहत्या घरामधूनच एका क्रिकेटसोशल मिडीया अ‍ॅपद्वारे इंग्लंड विरूध्द द. अफ्रिका या सामन्यावर सट्टा चालवित होता. याची माहिती वाकड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी जवळ रोख 40 लाख रूपये आणि दोन मोबाईल व एक कॅल्क्युलेटर असा 40 लाख 80 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपीचे दोन साथीदार धनू व शिवन यांचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा

Nashik Drug Case : ‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी

सावधान… इन्कम टॅक्सचं आपल्यावर लक्ष आहे..!

अन् ‘स्टॅच्यू’ चोरी करून पसार झाला!

Back to top button