पुण्यातून सुटल्या खासगी ठेकेदाराच्या शिवशाही, शिवनेरी बसेस | पुढारी

पुण्यातून सुटल्या खासगी ठेकेदाराच्या शिवशाही, शिवनेरी बसेस

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातून काल (गुरूवार) सायंकाळच्या सुमारास एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या शिवनेरी आणि शिवशाही बस सुटल्या. रात्री उशीरापर्यंत 8 बस स्वारगेट, शिवाजीनगर (वा.) पुणे स्टेशन येथून धावल्या. यामुळे आता एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या बस धावण्यास मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

शासनाकडून विविध मार्गांनी एसटी कर्मचार्‍यांचा संप मोडून काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणजे एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदाराच्या शिवनेरी आणि शिवशाही बस पुण्यातील एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करायला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर पडल्या. यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुण्यातून सुटलेल्या शिवनेरी, शिवशाही बस

– स्वारगेट स्थानक – 1 बस
– शिवाजीनगर (वाकडेवाडी) स्थानक – 1 बस
– पुणे स्टेशन स्थानक – 6 बस
– एकूण – 8 बस (सर्व खासगी ठेकेदार)

पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांमधून गुरूवारी रात्री 8 गाड्या सुटल्या. या सर्व गाड्या एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या होत्या. उद्याही ठेकेदारांच्या गाड्या प्रवासी वाहतूक सेवा पुरवतील.
– ज्ञानेश्वर रणनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग

Back to top button