Pune news : पारगाव ग्रा.पं.साठी सत्त्याहत्तर अर्ज दाखल | पुढारी

Pune news : पारगाव ग्रा.पं.साठी सत्त्याहत्तर अर्ज दाखल

दौंंड : पुढारी वृत्तसेवा : दौंंड तालुक्यातील पारगाव सा.मा. (ता.दौंंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.20) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. सदस्य संख्या सतरा व जनतेतून सरपंच एक अशा अठरा जागेसाठी जवळपास सत्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत.पारगाव येथे निवडणुकीत समोरासमोर तीन पॅनेल उभे ठाकल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसात निवडणुकीचे वातावरण गरमागरम होणार हे आता नक्की झाले आहे.

ग्रामपंचायतीत जवळपास 6 हजार 694 मतदार असून, त्यापैकी 3 हजार 300 महिला मतदार असून, 3 हजार 394 पुरुष मतदार आहेत. गावात सहा प्रभाग असून, सतरा सदस्य, तर अठरावा जनतेतून सरपंच असे संख्याबळ आहे.अर्जाची छाननी 23 ऑक्टोबर, तर माघार व चिन्हवाटप 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दि.5 नोव्हेंबरला मतदान होणार असून,दि.6 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

6,31,885 रुपये एवढी करवसुली
निवडणुकीमुळे जवळपास 99 नागरिकांनी ना हरकत दाखले नेले आहेत.तर दि.16 ते 20 ऑक्टोबर या पाच दिवसांत 5,12,270 रुपये घरपट्टी, तर पाणीपट्टी 1,19,615 रुपये,अशी एकूण : 6,31,885 रुपये करवसुली झाली आहे.

सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेली नावे
1) शेख राजू शाबुद्दीन.2) ताकवणे संभाजी दत्तात्रय. 3) ताकवणे मच्छिंद्र जालिंदर. 4) ताकवणे भास्कर बबन.5) बोत्रे सुभाष दत्तात्रय. 6) बोत्रे शांताराम नामदेव. 7) ताकवणे ज्ञानदेव नारायण. 8) बोत्रे सुभाष दत्तात्रय.

Back to top button