अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर या नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी तीनही नद्यांच्या अहमदाबादच्या एचसीपी डिझाईन अॅण्ड मॅनेजमेंट एजन्सीकडून आराखडा तयार करण्यात आला. पवना नदीचे 24.40 किलोमीटर अंतराचे दोन्ही बाजूचा काठावर काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 556 कोटी खर्च आहे. इंद्रायणीच्या एका बाजूचे 18.80 किलोमीटर अंतराचा काठ असून, त्यासाठी 1 हजार 200 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. तर, मुळा नदीच्या 14.40 किलोमीटर अंतराच्या एका बाजूचे काम करण्यासाठी 750 कोटी खर्च रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटी रूपयांचे म्युन्सिपल बॉण्डही काढण्यात आले आहेत. मात्र, सरकारची मंजुरी मिळत नसल्याने महापालिकेस काम सुरू करता येत नाही.