Pune : धनादेश न वटल्याने 5 लाखांचा दंड, तुरुंगवास | पुढारी

Pune : धनादेश न वटल्याने 5 लाखांचा दंड, तुरुंगवास

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  धनादेश न वटल्याप्रकरणी दौंड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस 5 लाख रुपये दंड व 6 महिने साधा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. परशुराम बुवाजी निखळे (रा. रावणगाव, ता. दौंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शंकर जयराम पाटील (रा. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली होती. परशुराम निखळे व शंकर पाटील यांची व्यवसायातून ओळख झाली होती. व्यावसायिक अडचणीकरिता परशुराम निखळे यांनी शंकर पाटील यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते. शंकर यांनी पैसे परत मागितले असता परशुराम यांनी डिसेंबर 2021 मध्ये अडीच लाख रुपयांचा धनादेश शंकर यांना दिला.

परंतु हा धनादेश वटला नाही. त्यामुळे शंकर यांनी वकिलामार्फत परशुराम यांना नोटीस पाठवली. तरीही परशुराम यांनी रक्कम दिली नाही. त्यामुळे शंकर यांनी परशुराम यांच्या विरोधात दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार हा खटला दौंड न्यायालयात सुरू होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जी. कुलकर्णी-लगारे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी परशुराम यांना पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवत त्यांना 5 लाख रुपये दंड व 6 महिने साधा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शंकर यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र बोडके यांनी काम पाहिले.

Back to top button