पुणे-नाशिकच्या आराखड्यात मध्य रेल्वे करणार बदल | पुढारी

पुणे-नाशिकच्या आराखड्यात मध्य रेल्वे करणार बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महारेलच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीडच्या अंतिम आराखड्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे मध्य रेल्वेकडून त्यात बदल करण्यात येणार आहे. त्रुटी पूर्ण झाल्यावर आराखड्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. महारेलच्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू आहे. त्यासंदर्भातील आराखडा तयार झाला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे  बोर्डाला पाठविला होता.
मात्र, त्यामध्ये रेल्वे बोर्डाला काही त्रुटी आढळल्यामुळे रेल्वे बोर्डाने हा आराखड्याचा प्रस्ताव अंतिम तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला दिला आहे. मध्य रेल्वेकडून आता याबाबतच्या कामाची कार्यवाही सुरू असून, त्यातील त्रुटी दूर केल्यानंतर सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. खोडद येथील जीएमआरटी भागात याची काही समस्या निर्माण झाली आहे. त्यावर अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही. त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. यात मध्य रेल्वे पुढाकार घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशी आहे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड

 

  • 235 किलोमीटर अंत
  • 18 बोगदे
  • 19 उड्डाणपूल
  • विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग
  • 6 कोच सुरुवातीला, नंतर 12 ते 16 कोच बसवणार
  • सुरुवातीला 200 किलोमीटर प्रतितास वेग, नंतर 250 पर्यंत वाढवू शकणार
  • 20 स्टेशन
  • सुमारे 16 हजार 39 कोटींपर्यंत खर्च लागणार
  • पुणे-नाशिक प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत
  • असा आहे प्रकल्प…
  • 2 जून 2020 ला
  • रेल्वे बोर्डाची मंजुरी
  • हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार
  • चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा, संगमनेरला
  • प्रमुख स्थानके
  • मालवाहतूकीसाठी लोडिंग, अनलॉडिंग सुविधा
  • प्रकल्प 1200 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
  • हायस्पीड रेल्वेगाडीच्या मार्गावर एक्स्प्रेस आणि मालगाड्यादेखील धावणार
पुणे-नाशिकचा प्रस्ताव मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे जाणार आहे. काही त्रुटी आढळल्याने रेल्वे बोर्डाने त्याचे काम आमच्याकडे आले आहे. त्यातील त्रुटी सोडवून अंतिम प्रस्ताव रेल्वे बोर्डाला देणार आहे.
                                                                                    – नरेश लालवाणी,  महाप्रबंधक, मध्य रेल्वे.
हेही वाचा :

Back to top button