Ring Road News : रिंगरोडसाठी 31 गावांतील भूसंपादन सक्तीने होणार

Ring Road News : रिंगरोडसाठी 31 गावांतील भूसंपादन सक्तीने होणार

पुणे : रिंगरोडसाठी रस्त्यातील पश्चिम भागातील गावांचे भूसंपादन सुरू आहे. आधी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील 13 गावांमधील जमिनींचे सक्तीने भूसंपादन करण्याचे यापूर्वीच निश्चित झाले. पश्चिम भागातील 31 गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास
जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत भूसंपादन करण्याचे निश्चित केले. त्यामध्ये पूर्वभागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे.

मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील 31 गावांतील स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही. भूसंपादनासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही, त्यांना अंतिम नोटीस पाठवून सक्तीने भूसंपादन करण्यात येईल.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news