

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर अमृतांजन पूल व खंडाळा बोगदा येथे वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत गॅन्ट्री) उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. 10) दुपारी दोन वाजता ब्लॉक घेतला जाणार आहे.
द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत काम सुरू आहे. त्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक खुली केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकार्यांनी दिली.
हेही वाचा