पुणे : एका 65 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, पत्र्याच्या पेटीतील रोकड चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
पारूबाई किसन सावंत (वय 65, रा. मेनका स्टोन कंपनीजवळ, भिलारवाडी, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शहाजी मारुती चंदनशिवे (वय 60, रा. भिलारवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.