Pune News : ‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शनात साकारली देवींची विविध रूपे | पुढारी

Pune News : ‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शनात साकारली देवींची विविध रूपे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देवीच्या विविध रूपांसह पुण्याचे ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवींचे रूप आदिशक्ती रंगावली प्रदर्शनात साकारण्यात आले. रंगावलीकार शारदा अवसरे यांच्यासह 30 कलाकारांनी 18 रंगावलींच्या माध्यमातून देवींच्या विविध रूपांची महती उलगडली आहे.

बालगंधर्व कलादालन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन रंगावलीकार जगदीश चव्हण, अक्षय शहापूरकर, प्रतीक अथाने, कथक नृत्य कलाकार नेहा मुथियान यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 5 ऑक्टोबरपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य खुले राहणार आहे.

चव्हाण म्हणाले, रांगोळी ही भारतीय कला आहे. एक रांगोळी काढण्याकरिता खूप कष्ट लागतात. किमान 7 ते 8 तास एका ठिकाणी सलग मांडी घालून बसावे लागते. मात्र, कलाकृती पूर्ण झाल्यावर मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे असते. त्याची तुलना कोणत्याही गोष्टीही होऊ शकत नाही.

हेही वाचा

Pune News : सायबर चोरट्यांचा प्राध्यापकाला गंडा

पुणे : तरुणाईच्या सहभागात शांततेचा संदेश

Pune news : ‘उजनी’त 12 टीएमसी पाणीसाठा वाढला

Back to top button