पुणे : संतोष जगताप खूनातील आरोपींना 'मोक्का' लावण्याची मागणी - पुढारी

पुणे : संतोष जगताप खूनातील आरोपींना 'मोक्का' लावण्याची मागणी

यवत : पुढारी वृत्तसेवा

संतोष जगताप खून प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी संतोष जगताप यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २२ ऑक्टोबर रोजी भरदिवसा उरुळी कांचन (ता. हवेली जि. पुणे) येथे संतोष संपतराव जगताप यांचा खून करण्यात आला होता.  हा खून आणि खुनाचा कट रचणे यामध्ये राहू (ता. दौंड जि. पुणे) मधील उमेश सोनवणे याच्यासह इतर ७ जणांचा समावेश आहे. तरी त्यांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसेच उमेश सोनवणे याची नॉर्को टेस्ट करावी, अशीही मागणी केली आहे.

या ७ जणांना या खून प्रकरणी अटक करण्यात यावी. अन्यथा सोमवारपासून (दि. ८) लोणी काळभोर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील जगताप कुटुंबियांनी दिला आहे. तसेच सोनवणे कुटुंबियांची राहू गावात दहशत असून त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचेही जगताप कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या खून प्रकरणी आत्तापर्यंत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महादेव आदलिंगे, पवन मिसाळ, उमेश सोनवणे, अभिजीत यादव आणि आकाश वाघमोडे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button