Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील 5 दिवस हलका, तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील 5 दिवस हलका, तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुढील पाच दिवस हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारी राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या काही भागांत तुरळक पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात सुमारे महिन्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. अधूनमधून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पुढील 5 दिवस विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातही काही भागांत मुसळधार पाऊस पडेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news