पुणे जिल्ह्यातील धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज; घ्या जाणून धरणातील पाणीसाठा | पुढारी

पुणे जिल्ह्यातील धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज; घ्या जाणून धरणातील पाणीसाठा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा खोर्‍यातील मध्यम व मोठ्या आकाराच्या 38 प्रकल्पांमध्ये शुक्रवारी (दि. 8) 77 टक्के पाणीसाठा झाला आहे. कालपासून पुणे जिल्ह्यातील काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. या खोर्‍यातील सर्वांत मोठे असलेल्या उजनी धरणात 18 टक्के, तर कोयना धरणात 80 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 20 धरणांमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा जमा झालेला आहे.

कृष्णा खोर्‍यात भीमा आणि कृष्णा अशी दोन उपखोरी आहेत. त्यापैकी भीमा उपखोर्‍यात प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 198.34 टीएमसी असून, सध्या 132.40 टीएमसी (66.75 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर कृष्णा उपखोर्‍यात उपयुक्त पाणीसाठा 209.80 टीएमसी असून, सध्याचा उपयुक्त पाणीसाठा 174.31 (83.06 टक्के ) एवढा आहे. धरणे शंभर टक्के भरण्यासाठी सलग मोठ्या पावसाची गरज आहे.

भीमा खोरे धरणे पाणीसाठा

धरण – उपयुक्त साठा (टीएमसी) – टक्केवारी
पिंपळगाव जोगे 2.68 68.99
माणिकडोह 6.44 63.28
येडगाव 0.38 19.30
वडज 1.07 91.39
डिंभे 11.49 92.02
घोड 0.94 19.33
चिल्हेवाडी 0.48 59.57
कळमोडी 1.51 1000
चासकमान 7.45 98.31
भामा आसखेड 6.89 89.84
वडिवळे 1.07 100
आंद्रा 2.91 99.56
धरण – उपयुक्त साठा (टीएमसी) – टक्केवारी
पवना 8.51 100
कासारसाई 0.57 100
मुळशी 17.65 87.55
टेमघर 2.97 80.03
वरसगाव 12.71 99.11
पानशेत 10.59 99.41
खडकवासला 0.89 45.07
गुंजवणी 3.28 88.90
नीरा देवघर 11.68 99.57
भाटघर 22.43 95.43
वीर 5.59 59.37
उजनी 9.64 17.99

कृष्णा खोरे पाणीसाठा

धरण उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)— टक्के
कोयना 80.17 80.07
धोम 8.81 75.34
कण्हेर 7.69 8.11
वारावती 25.18 91.49
दूधगंगा 20.91 87.18
राधानगरी 7.67 98.80
धरण— उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)— टक्के
तुळशी 2.58 79.48
कासारी 2.75 100
पाटगाव 3.52 95.09
धोम बलकवडी 3.88 97.94
उरमोडी 5.58 57.78
तारळी 5.51 94.29

हेही वाचा

पृथ्वीच्या भेटीला पाच लघुग्रह

पुणे-सातारा महामार्गावर अजित पवारांचे जंगी स्वागत

पुणे : विहिरींमध्ये जमा होणार पडणारा पाऊस

Back to top button