महावितरणचा ढिसाळपणा बेतला त्याच्या जिवावर ; तरुणाचा मृत्यू | पुढारी

महावितरणचा ढिसाळपणा बेतला त्याच्या जिवावर ; तरुणाचा मृत्यू

मंचर : पुढारी वृत्तसेवा : साकोरे (ता. आंबेगाव) येथून दुचाकीवरून (एम. एच. 14 एच. एफ. 7794) मंचर येथे जात असताना साकोरी वडगाव रस्त्यावरील बंधार्‍याजवळ महावितरणचा सिमेंटचा खांब अंगावर पडून विशाल संतोष ढगे (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवरमागे बसलेला अजित साहेबराव मोंढवे हा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी( दि .8) सकाळी घडली. महावितरणचा हा खांब कुठलाही आधार न देता उभा केला होता.

रात्री झालेल्या पावसामुळे खांबाच्या खालील भागातील मातीचा भराव वाहून गेल्याने व माती खचल्याने हा खांब अंगावर पडल्याचे ढगे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस जवान राजेंद्र हिले, विलास साबळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. मयत विशालच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात विशालच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा :

पुणेकर शास्त्रज्ञाचे पेलोड; सूर्याच्या अभ्यासात ‘आयसर’चा महत्त्वाचा सहभाग

अहमदनगर : कर्डिले-तनपुरेंमध्ये पुन्हा संघर्ष; राहुरी कारखाना चालविण्यास देण्यावरून वाद

Back to top button