पिंपरी : इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

पिंपरी : इमारतीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 6) सकाळी घडली. अजय रंगनाथ हंडीबाग (21, रा. शिवशंकर हौसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अजय हे बुधवारी सकाळी डांगे चौक, येथील हाय लाइफ टॉवर येथील इमारतीमध्ये कामानिमित्त गेले होते.

दरम्यान, मोबाइल फोनवर बोलत असताना ते खाली पडले. मोबाइलचा डिस्प्ले फुटल्याने ते कोणाशी बोलत होते ते समजू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर मागविण्यात आला आहे. तसेच, ज्या ठिकाणावरून ते खाली पडले तिथे कठडे आहेत. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या आहे, याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button