पुणे : फळभाज्यांची स्वस्ताई

पुणे : फळभाज्यांची स्वस्ताई
Published on
Updated on

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात पुणे विभागासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक वाढली आहे. रविवारी (दि. 3) बाजारात 125 वाहनांमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत आवक 15 वाहनांनी वाढल्याचे सांगण्यात आले. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, पापडी व वालवरच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली, तर मागणी वाढल्याने आल्याचे दर वाढल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी सुमारे 4 ते 5 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो शेवगा, इंदौर येथून 8 ते 9 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 5 ते 6 टेम्पो, गुजरात येथुन भुईमूगाच्या शेंगा 1 टेम्पो तर मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, गवार 7 ते 8 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो सुमारे 12 ते 13 हजार क्रेट्स, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 14 ते 15 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, भुईमुंग शेंगा सुमारे 100 ते 150 गोणी, पुरंदर, वाई सातारा येथुन मटार 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 80 ट्रक, इंदूर, आग्रा भागातून बटाटा 40 ते 45 ट्रक आवक झाली होती.

पालेभाज्यांतील स्वस्ताई टिकून
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 3) पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्यांना मागणीही चांगली राहिल्याने पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून राहिले. रविवारी बाजारात कोथिंबिरीची सव्वा लाख, तर मेथीची पन्नास हजार जुडी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीची
3 ते 18 रुपये, तर किरकोळ बाजारात एका गड्डीची दहा ते पंधरा रुपये या दराने विक्री सुरू होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news