

पुढारी वृत्तसेवा : आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्याच्या पाणी कपातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा असून 15 ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील बैठकीत तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे असे समोर आले.
या निर्णयावर पावसाचा खंड असला तरी धरणे भरलेली आहेत. त्यामुळे पुण्याची संभाव्य पाणीकपात होणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. महापालिकेकडून अतिरिक्त पाण्याची मागणी नसल्याने पुण्याची पाणीकपात तूर्तास टळली असल्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्टीकरण दिले. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह आमदार उपस्थित होते.
हेही वाचा :